crime in hotel room
crime in hotel room saam tv
मुंबई/पुणे

प्रेयसीसोबत संबंध ठेवताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

नरेश शेंडे

मुंबई : कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये वरळीत राहणाऱ्या एका ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Person Death) झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. मृत व्यक्तीनं त्याच्या प्रयेसीसोबत कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास चेक इन केलं होतं. त्यानंतर प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवताना (Physical relationship) सदर व्यक्ती अचानक बेशूद्ध झाला. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बेशूद्ध झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी (Mumbai Police) सायन रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, प्रियकराच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीनं त्याच्या प्रयेसीसोबत कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास चेक इन केलं होतं. हॉटेलमध्ये रुम बुक करताना आपण प्रेयसीसोबत असल्याचा दावा त्या प्रियकरानं केला होता. दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवताना असताना तिचा प्रियकर अचानक बेशूद्ध झाला. त्यानंतर त्याच्या प्रेयसीने तात्काळ रिसेप्शनला संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क करुन घडलेल्या प्रकाराबाबत सांगितंल. त्यावेळी कुर्ला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केलं.

परंतु, उपाचारापूर्वीच प्रियकराचा मृत्यू झाला असल्याचं घोषीत करण्यात आलं. त्यानंतर पुढील चौकशीसाठी मृत व्यक्तीसोबत असलेल्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. मृत पावलेला व्यक्ती एका खासगी कंपनीत काम करायचा. तो वरळी येथे राहत होता. शारिरीक संबंध ठेवताना त्याने मद्य प्राशन केलं होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध झाला.अशी माहिती त्या महिलेनं पोलिसांना दिली. तर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोदं केली आहे. मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याची माहिती मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Today's Marathi News Live : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

SCROLL FOR NEXT