Maharashtra CM Eknath Shinde News
Maharashtra CM Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी एसआयटी करणार तपास; CM एकनाथ शिंदेंचे निर्देश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस (Police) अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. एवढंच नाही तर, अत्याचारानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आलं.

पीडितेवर सध्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिलाआरोपी मात्र अद्याप देखील फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

SCROLL FOR NEXT