निर्दयी भावाने केली बहिणीची हत्या! सहा वर्षांपूर्वीही केला होता पत्नीचा खून!  अजय दुधाने
मुंबई/पुणे

निर्दयी भावाने केली बहिणीची हत्या! सहा वर्षांपूर्वीही केला होता पत्नीचा खून!

मृतदेह दोन दिवस घरात कुजला! इमारतीत दुर्गंधी पसरल्या पोलिसांना दिली माहिती.

अजय दुधाने

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) कॅम्प क्रमांक एक भागात भावानेच बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सचदेव नगर मध्ये दोन दिवसांपूर्वी भावाने बहिणीची हत्या करून मृतदेह घरात ठेवला होता. आज दुपारी सदर इमारतीत दुर्गंधी पसरल्याने घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला मिळताच लागलीच पोलिसांनी संशयित आरोपाला ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचदेव नगर मधील एका इमारतीत योगेश म्हैसमाळे आणि अरुणा म्हैसमाळे हे दोघे बहीण भाऊ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी या दोघांनमध्ये काही तरी वाद झाला. या वादात भावाने बहिणीची हत्या केली.

मात्र, या हत्याचे कारण समजू शकले नसले तरी पोलिसांनी योगेश म्हैसमाळे या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान योगेश म्हैसमाळे याने सहा वर्षांपूर्वी आपल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणात तो कारागृहात असताना, अरुणा या मयत बहिणीने त्याला जामिनावर सोडवून आणले होते आणि ते सोबत राहत होते. मात्र या निर्दयी भावाने आज या बहिणीचीच हत्या केल्याने परिसरात योगेश बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT