Mumbai Railway  Saam TV
मुंबई/पुणे

Railway Accident CCTV Footage : बायकोला धक्का लागला, पतीने कानशिलात लगावली; लोकलखाली सापडून तरुणाचा मृत्यू VIDEO

Sion Railway Station Accident : अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल हिला पोलिसांनी अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावरील एक मन सुन्न करणारी अपघाताची घटना समोर आली आहे. महिलेला धक्का लागल्यानंतर दाम्पत्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा जीव गेला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना या दाम्पत्याला अटक केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

१३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. सायन रेल्वेस्थानकावर दिनेश राठोड (वय २६) नावाचा तरुण रेल्वेची वाट पाहत उभा होता. तेथेच अविनाश माने आणि शीतल माने हे पती-पत्नी रेल्वेची वाट पाहत होते. दरम्यान प्लॅटफॉर्मवर चालत असातना दिनेशचा महिलेला धक्का लागला.

धक्का लागताच शीतलने दिनेशला छत्रीने मारहाण केली. दोघांमध्ये वाद सुरु असताना काही अंतरावर उभा असलेला तिच्या पतीने मागून येत दिनेशच्या जोरदार कानशिलात लगावला. हा फटका इतका जोरदार होता की दिनेशचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवरुन थेट ट्रॅकवर कोसळला.

दुदैवाने त्याचवेळी ट्रॅकवर ट्रेन आली. दिनेशने कसंबसं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. उभं राहून दिनेशने प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेनमध्ये अडकून दिनेशचा मृत्यू झाला. या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओही समोर आला आहे. (Maharashtra News)

या घटनेनंतर अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT