MHADA House Pune: पुणेकरांसाठी गुडन्यूज! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५००० घरांसाठी सोडत निघणार; अर्ज विक्री कधीपासून?

MHADA Lottery Pune: म्हाडाच्या पुणे मंडळाने (Mhada House Pune) पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
MHADA House Pune
MHADA House PunePune News
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

MHADA House News: म्हाडाच्या पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून या सोडतीची जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री – स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

MHADA House Pune
Guard Killed Neighbors For Saree: पत्नीच्या साडीसाठी शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या; धक्कादायक घटनेनं हरियाणात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडाच्या पुणे मंडळाने (Mhada House Pune) पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीच्या जाहिरातीची तयारी पूर्ण झाली असून २५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच 25 ऑगस्टपासूनच अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे.

या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे.

MHADA House Pune
BJP Plan For 2024 Loksabha Elections : नरेंद्र मोदींचा मास्टरप्लान; लोकसभा निवडणुकांआधीच भाजपमध्ये भाकरी फिरणार?

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई (Mumbai) मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shindde) यांनी लवकरच कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी सोडत काढण्यात येईल असे जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com