Sion Hospital
Sion Hospital Saam Digital
मुंबई/पुणे

Sion Hospital : नैसर्गिक प्रसूतीसाठी सायन रुग्णालयानं आणलं नवं मॉडेल; येत्या ५ वर्षात सर्व हॉस्पिटलमध्ये असणार सुविधा?

Sandeep Gawade

अलिकडे सर्वत्र सिझेरीयन प्रसुतींची संख्या वाढत चालली आहे. मात्र नैसर्गीक प्रसूती व्हावी, अशी इच्छा सर्वांची असते. प्रसूती कळा सहन करण्याची क्षमता नसणे किंवा जोखीम नको म्हणून सिझेरीयनचा पर्याय स्वीकारण्याचा कल बहुतांश जोडप्यांचा असतो; मात्र आता सायन रुग्णालयाने नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी एक मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलच्या अंमलबजवणीमुळे सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी होत आहे. तर नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण ७५ ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

सायन रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात एकूण सहा यूनिट्स आहेत. त्यापैकी डॉ. एन. एन. चव्हाण यूनिट विभागात दरवर्षी सरासरी १५०० ते १७०० प्रसूती होतात. डॉ. निरंजन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायन मॉडेल तयार केले आहे. गेल्या जुलै महिन्यांपासून रुग्णालयात प्रसुतींसाठी या मॉडेलचा वापर केला जात आहे. यापूर्वी त्यांच्या यूनिटमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण ५५ ते ६५ टक्के होते. मॉडेल लागू केल्यापासून नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. या मॉडेलमध्ये अजून सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काय आहे मॉडेल

मुख्य सी-सेक्शन दर लक्षणीयरित्या कमी करण्यात मदत करते. गर्भवतीच्या मांडीवर २४ फ्रेंच फॉलीज कॅथेटर लावला जातो. ते गर्भाशयाच्या प्रवेशद्वारावर जोडले जाते. त्यानंतर कॅथेटरचा दबाव वाढवल्याने प्रवेशद्वार प्रसरण पावते. यामुळे बाळ बाहेर यायला मदत होते. या पद्धतीने प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली जाते; मात्र या पद्धतीत गर्भवतीतेला तीव्र वेदना होतात. तसेच सिझेरीयनमुळे महिलेला भविष्यात त्रास होतो. सायन मॉडेल हे कॅलिफोर्निया मॅटर्नल क्वालिटी केअर कोलॅबोरेटिव्ह जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या टुलकिटच्या वापरातून सिझेरीयन करणाऱ्यांची संख्येत ५ ते ६ टक्के घट झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

अशी केली जाते तयारी

रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलांचे आम्ही सर्वेक्षण केले. १३१ जणींपैकी किती लोकांना नैसर्गिक प्रसूती हवी आहे, हा प्रश्न विचारला. त्यावेळी ८० ते ८५ टक्के जणांनी नैसर्गिक प्रसूती हवी असल्याचे सांगितले. सिझर केलेल्या ६५ टक्के जोडप्यांनी नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिन्यापर्यंत विविध टप्यात आम्ही गर्भवती महिला, तिचे पती, जवळच्या नातेवाईकांचे समुपदेशन करतो. चांगला डायट तसेच इतर सूचना करतो. त्यांच्या शंका-कुशंकचे निवारण करतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक व्यायाम करण्यास सांगतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी त्यांची परवानगी आम्ही घेतो असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात हे मॉडेल सर्वत्र लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मॉडेलमुळे आम्ही नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यात मदत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT