pune , sinhgad police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : नऱ्हेत गोळीबार, नागरिकांमुळे टळली माेठी लूट; युवकांचा सिंहगड पोलिसांकडून शाेध सुरु

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Crime News : वाईन शॉप मालकाच्या हातून पैश्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार दोन अज्ञात लुटारूंनी केला. मात्र कामगार आणि नागरिक जमा झाल्याने लुटारूंनी हवेत गोळीबार करून पलायन केले आहे. या घटनेने काही काळ नऱ्हे (narhe) परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. (Maharashtra News)

नऱ्हे परिसरात हिरो वाईन्स या नावाने वाईन्स शॉप आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाईन शॉप मालक दुकान बंद करून आपल्या गाडीत बसत असताना धायरी फाट्याच्या दिशेने एका दुचाकीवर अनोळखी दोघेजण आले. त्यावर पुढे बसलेल्या काळया रंगाचा शर्ट घातलेल्या व मागील बाजुस बसलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या तरुणांनी दुचाकीवरून खाली उतरुन तक्रारदार यांच्याजवळ येवून त्यांच्या हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतील दोन लाख एकोणीस हजारांची रोकड हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

परंतु वाईन शाॅप मालक यांनी ती बॅग घट्ट पकडल्याने तरुणांचा लुटीचा प्रयत्न फसला. मालकाकडून त्यांना पैश्यांची बॅग मिळाली नाही. दरम्यान दुकानातील कामगार व नागरिक जमा झाल्याने तसेच बॅग न मिळाल्यामुळे या अनोळखी तरुणांनी त्यांच्या हातात असलेले पिस्तुल दहशत पसरवण्याचे उद्देशाने हवेच्या दिशेने रोखुन त्यातील एक गोळी फायर केली व पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी गुन्हा नाेंद झाला असून सिंहगड पोलिस संशयितांचा तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT