Akshaya Tritiya मुहूर्तावर स्वाभिमानीने घातलं सरकारचं श्राध्द

शेतकऱ्यांना अजून मदत मिळाले नाही. त्यामुळे हे आंदाेलन छेडले आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana, buldhana
Swabhimani Shetkari Sanghatana, buldhanasaam tv
Published On

Buldhana News : अक्षय तृतीयेच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सुबुद्धी मिळो.. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) आज (शनिवार) संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचे प्रतिमेसमोर टरबूज, कांदा व इतर मिष्टान्न पदार्थाचा "पान पुजण्याचा व श्राद्ध करण्याचं अनोखं आंदोलन केले. (Maharashtra News)

Swabhimani Shetkari Sanghatana, buldhana
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : ‘राजाराम’साठी आज सत्ताधारी, विराेधी पॅनेलची बालेकिल्ल्यात सभा; रविवारी मतदान

या आंदाेलनाबाबत प्रशांत डीक्कर (विदर्भ युवा प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना) म्हणाले राज्यातील शेतकरी हा अवकाळीच्या फेऱ्यात सापडला असताना सरकार आपल्याच तोऱ्यात वागत आहे. खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीचा अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. रब्बी हंगामातील कांदा ,गहू ,हरभरा इत्यादी पिकांच मोठं नुकसान अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे झालेल आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजून मदत मिळाले नाही. त्यामुळे हे आंदाेलन छेडले आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana, buldhana
Parbhani News : रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी आज Line Block; चार रेल्वे गाड्या उशिराने धावणार

ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजाचं स्मरण म्हणून त्यांना मिष्टान्न नैवेद्य दाखवला जातो. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध करण्याची ही प्रथा आजही सुरू आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पान पूजून व नैवद्य देऊन अनोख आंदोलन केलं आहे असे डीक्कर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com