Siddhu Moose Wala
Siddhu Moose Wala  Saam Tv
मुंबई/पुणे

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: पुण्यातील शार्पशूटर सौरव महाकाळच्या मुसक्या आवळल्या

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पंजाबी गायक काँग्रेस (Congress) नेता सिद्धू मुसावाला गोळीबार प्रकरणातील मुख्य संशियत आरोपी संतोष जाधव याचा सहकारी सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाळ हिरामण कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरव महाकाळ याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिद्धू मुसावाला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला आश्रय दिल्याप्रकरणी, तसेच मंचर येथील एका खुनाच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महाकाल हिरामण कांबळे याला अटक केली आहे. संतोष जाधव आणि महाकाल कांबळे हे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे.

संतोष जाधव आणि महाकाल कांबळे हे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे. महाकाल कांबळे वर पुण्यातील मंचर मध्ये एक फुल मर्डर आणि राजस्थानमध्ये एक हाफ मर्डर चां एक गुन्हा दाखल आहे.

महाकाल कांबळे याने संतोष जाधव सोबत मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या पाच राज्यात अनेकवेळा एकत्र प्रवास केल्याचा आरोप देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. मात्र महाकाल कांबळेचा मुसेवाला खुनाच्या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नसून, त्याला पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आली. मात्र न्यायालयाने पोलीस तपासासाठी १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Siddhu Moose Wala) यांना गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख दोन दिवसापूर्वी पटली होती. यातील ८ जणांचे फोटो समोर आले होते. यातील ८ पैकी दोन शूटर्स हे पुण्यातील आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवाशी आहेत. यातील सौरव महाकाळ याला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. २ महाराष्ट्रातले, २ हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता.

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या AK 47 या बंदुकीने केलेल्या गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ३२ राऊंड फायर करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात १६ गोळ्या लागल्या. या घटनेमुळे हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती.

दरम्यान, आता या हत्येप्रकरणात सहभागी असलेल्या ८ आरोपींची ओळख पडली असून त्यातील दोन आरोपी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील असल्याची माहिती आहे. यातील संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याची माहीती आहे. गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ एकलहरे–फकीरवाडी येथे सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले (वय २६) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात संतोष जाधव याचा समावेश होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News | गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

Mumabi's Famous Food: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

SCROLL FOR NEXT