Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल META AI
मुंबई/पुणे

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

Maharashtra Politics : भाजप आणि मनसे मधील वाद आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरेंवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

संजय गडदे

भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत असताना या वादात शिंदेसेनेनेही उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत थेट आक्रमक भूमिका घेतली.

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली.

“अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. कुठेही आक्रमकता दाखवायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरायचे,” असा टोला सिद्धेश कदम यांनी लगावला.

पुढे अधिक आक्रमक होत कदम म्हणाले, “जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचा वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता?”

कदम यांच्या या जहाल वक्तव्यामुळे भाजप-मनसे वादाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेची फोडणी मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता तीन पक्षांमध्ये रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिद्धेश कदम यांच्या “पाकिस्तानात जा” या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच अमित ठाकरे किंवा मनसेचे वरिष्ठ नेते यावर प्रत्युत्तर देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Baramati News: 'सोमवेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

Walking Timing: सकाळी ७, दुपारी १२ की संध्याकाळी ७ वाजता...; कोणत्या वेळेला चालणं सर्वात बेस्ट?

मुंबईमध्ये विषारी ताडीचा संशय; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये टेबलावर कोसळताना दिसला तरुण

SCROLL FOR NEXT