Video: ..तर मनसेचे 50 आमदार झाले असते श्रीमंत कोकाटेंचा राज ठाकरेंना टोमणा Saam Tv
मुंबई/पुणे

Video: ..तर मनसेचे 50 आमदार झाले असते श्रीमंत कोकाटेंचा राज ठाकरेंना टोमणा

दोन दिवसांपुर्वी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा जन्मशताब्धी सोहळा पार पडला.

अमोल कविटकर, पुणे

दोन दिवसांपुर्वी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा जन्मशताब्धी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), प्रसिद्ध गायिका आशा भोसले, भाजपचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते. या कार्यक्रमात बाबासाहेबांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आलेल्या मान्यवरांनी आपआपल्या परीने बाबासाहेबांचे कौतूक केले त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतू या कार्यक्रमामुळे आता संभाजी ब्रिग्रेड आक्रमक झालेली पाहायला मिळात आहे.

संभाजी ब्रिग्रेडच्या डॅा. श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पायाशी आहेत म्हणूनच त्यांची अधोगती झालेली आहे. पुढे ते म्हणाले 'बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास राज ठाकरेंना माहिती नाही'. बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचं समर्थन राज ठाकरे यांनी करु नये असा सल्लाही कोकाटे यांनी दिला आहे. पुरंदरे यांच्या पायाशी राज नसते तर मसनेचे आमदार १३ वरुन ५० वर गेले असते असेही कोकाटे म्हणाले आहेत.

त्याचबरोबर संभाजी ब्रिग्रेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकरणात कुठलेही नवनिर्माण न करता आलेला आणि राजकरणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT