eknath sinde, shrikant shinde, uddhav thackeray, maharashtra,  saam tv
मुंबई/पुणे

'मृतदेह येतील, राऊतांची ही भाषा महाराष्ट्राची संस्कृती नव्हे; धमक्या दुस-यांना द्या' (व्हिडिओ पाहा)

आज (साेमवार) ठाण्यातील आनंद मठासमाेर माेठ्या प्रमाणात

विकास काटे

ठाणे : आम्ही काेणत्या पाेकळ धमक्यांना घाबरत नाही. या धमक्या काेणाला तरी दुस-यांना द्या असे प्रत्युत्तर नगरविकास मंत्रा एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे चिंरजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या वक्तव्यांबद्दल केले. खासदार शिंदे म्हणाले आमदारांचे मृतदेह येतील असे म्हणणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देशाची संस्कृती नाही. ते वैफल्यग्रस्त झाल्याने अशी बडबड करीत आहेत. आम्ही काेणीही शिवसेना साेडलेली नाही. शिवसेना (shivsena) ही एकच आहे असेही खासदार शिंदे यांनी नमूद केले. (shrikant shinde latest marathi news)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी ठाण्यातील टेंभी नाका येथील दिवंगत नेते आनंद दिघे (anand dighe) यांच्या आनंद मठ तसेच कार्यालयाच्या समोर माेठ्या संख्येने आज सकाळ पासून शिवसैनिक (shivsainik) जमले हाेते. त्यामुळे या आनंद मठ येथे पोलीसांचा माेठा बंदोबस्तात वाढविण्यात आला. तसेच परिसरातील रस्ते देखील बंद करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत सेना नेते आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आमचे हे शक्ति प्रदर्शन नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आधारीत तसेच दिवंगत आनंद दिघे यांच्या शिकवण यानूसार ठाण्यातील शिवसैनिक कार्यरत आहे. शिवसेना एकच आहे. आमच्यात (Eknath Shinde Latest News) गट तट नाहियेत. कोणीही सेना सोडलेली नाही. संजय राऊत यांनी बोलताना विचार केला पाहिजे असेही शिंदे म्हणाले. त्यांना आता राज्याची जनताच उत्तर देईल असेही खासदार शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

SCROLL FOR NEXT