मुंबई : आकाशात बदलणाऱ्या ग्रहांनुसार त्याचे चांगले व वाईट असे दोन्ही स्वरुपाचे फल आपल्याला मिळत असते. अनेक युतींचे आपल्याला त्याचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम मिळत असतात.
हे देखील पहा -
कुंडलीतील कोणत्याही घरात राहू आणि मंगळ एकत्र आल्यास अंगारक योग बनतो. मंगळ हा ऊर्जेचा स्त्रोत असून अग्नि तत्वाचा ग्रह आहे. राहू हा वायू, भ्रम आणि नकारात्मक भावानांचा ग्रह आहे यामुळे दोन्ही ग्रह एकत्र आल्याने यांची शक्ती अधिक वाढत जाते. २७ जून रोजी मेष राशीत हे दोन्ही ग्रह प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत हिंसक घटना, दहशतवादी कारवाया, राजकीय उलथापालथ आणि मोठे अपघात होऊन नागरिकांचे व पैश्यांचे अधिक नुकसान होईल. मंगळ आणि राहूची ही युती महत्त्वाची देखील आहे. शनी हा कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे तो अधिक अशुभ ठरण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीपासून शनिकडून मेष राशीत जाणारा मंगळाचे फल हे २७ जून ते १२ जुलै पर्यंत राहिल त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचा विशेष परिणाम होईल. तसेच १२ जुलैच्या सूर्यास्तानंतर शनि पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. मेष राशीत असणाऱ्या मंगळावर शनीची दृष्टी असल्यामुळे भारताच्या पूर्व भागात राजकीय घटनांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच मंगळ आणि राहूवर शनिची दृष्टी असल्यामुळे अग्निपथ योजनेचे विशेष परिणाम दिसतील.
२७ जून रोजी मेष राशीत मंगळने प्रवेश केल्यामुळे १० ऑगस्ट पर्यंत राहू सोबत युती असेल. २ ऑगस्टला राहू आणि मंगळ अधिक जवळ येतील. या युतीच्या प्रभावामुळे १२ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान भारताच्या (India) इतर भागात अधिक पाऊस (Monsoon) पडून धनहानी होईल. तसेच पूर येण्याची देखील शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांच्या कुंडलीत कन्या लग्न असून आठव्या स्थानात राहू-मंगळ युती असल्याने सरकार पडू शकते. या राजकीय घडामोडीमुळे राज्यात अस्थिरता निर्माण होऊन नागरिक अधिक आक्रमक बनतील.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.