Mumbai Crime अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Crime: दुकानदाराचा ग्राहकावर जीवघेणा हल्ला; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

थॉमस यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अजय दुधाणे

मुंबई - मोबाईल चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती केला तो पुन्हा व्यवस्थित दुरुस्ती करून घेण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध ग्राहकावर मोबाईल (Mobile) दुकान मालकाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. थॉमस बाबू जॉर्ज असे गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. थॉमस यांनी उल्हासनगर (Ulhasnagar)कॅम्प नंबर ४ येथील जितेश सिधवा यांच्या मोबाईल रिपेरिंग सेंटरमध्ये विवो कंपनीचा मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी दिला होता.

हे देखील पहा -

परंतु तो चुकीच्या पद्धतीने दुरुस्त झाला तो पुन्हा दुरुस्ती करून द्यावा यासाठी थॉमस हे जितेशच्या दुकानात गेले त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.त्यानंतर जितेशने थेट त्याच्याकडील दांडक्याने थॉमस यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. थॉमस यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी जितेश सिधवा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सावंत हे करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल! टेस्ट पास करण्यासाठी सरकारचा नवा नियम आला समोर, वाचा सविस्तर

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

SCROLL FOR NEXT