Pune Accident Minor Accused Rap Song Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Car Accident: 'बिल्डर का बेटा हूँ इसलिए बेल मिल गयी', 2 जणांचा बळी घेतल्यानंतर आरोपीचं रॅप साँग; संतापजनक VIDEO

Satish Kengar

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

ड्रंक अँड ड्राईव्हमधला अल्पवयीन आरोपचा आणखी एक उद्दामपणा समोर आलाय. दोन जणांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीनं रॅप साँग तयार करून लोकांनी शिवीगाळ केल्याचं समोर आलंय. हा माजुर्डेपणा आणि ही मुजोरी नेमकी येते कुठून, असा संतप्त सवाल विचारला जातोय.

हा संतापजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. यानंतर राज्यभरातून याचा निषेध करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर जेव्हा हा मुलगा घरी गेला, त्याच दिवशी त्यांनी हा व्हिडिओ बनवला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या व्हिडिओत ज्याप्रकारे हा अल्पवयीन आरोपी बोलत आहे, ज्याप्रकारे तो भाषा वापरात आहे, ती उद्दाम आहे, जी व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यातच आता पुणे पोलीस या व्हिडिओची चौकशी करणार का? तसेच या मुलावर या संदर्भात काही कारवाई होणार का? असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

दरम्यान, अपघानंतर अल्पवयीन आरोपाला तातडीने जामीन मिळाला होता. पोलिसांनी नंतर त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला. यानंतर अल्पवयीन आरोपीची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पोलीस आता यावर काय कारवाई करते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT