Men Self Destruction Saam TV
मुंबई/पुणे

Men Self Destruction: धक्कादायक! पुरुषांना झालंय तरी काय? महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण २.५ पट जास्त

Ruchika Jadhav

Mumbai:

भारतात आत्महत्येच्या प्रमाणाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात नैराश्यात जातात. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. देवनारच्या एका संस्थेने केलेल्या निरीक्षणात भारतात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण २.५ पटीने जास्त असल्याचे नोंदवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, देवनारच्या इंटरनॅश्नल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्लुलेशन सायन्सेस या संस्थेने आपल्या विश्लेषणात असं म्हटलं आहे. साल २०१४ मध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण दुप्पट नोंदवण्यात आले होते. त्यानंतर साल २०२१ च्या रिपोर्टमध्ये हेच प्रमाण २.५ टक्क्यांनी वाढलं आहे.

आत्महत्येचे प्रमाण नोंदवताना दर एक लाख लोकसंख्येमागे झालेल्या आत्महत्या मोजण्यात आल्यात. यात पुरुषांचे स्वत:हून जीवन संपवण्याचे प्रमाण जास्त आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार, साल २०१९ ते २०२१ मध्ये महिलांच्या तुलनेत १.१८ लाख पुरुषांनी आत्महत्या केली आहे. पुरुषांच्या आत्महत्येमध्ये बहुतांश पुरुष महिलांमुळे पीडित असून १८ ते २९ वयोगटातील आहेत.

आत्महत्येच्या प्रमाणात विविध संस्थांनी आपले निरीक्षण नोंदवले आहे. महिला आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार व्यक्त करतात. वेळ पडल्यास समुपदेशन निवडतात. मात्र पुरुषांचे मानसीक खच्चीकरण झाल्यावर ते जास्त व्यक्त होत नाहीत. यामुळेच पुरुष शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडतात. त्यामुळे पुरुषांमधील आत्महत्येचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त असल्याचं दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT