Pune Shocking  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: पुण्यात खळबळ! रस्त्यावर मधोमध मानवी सांगाडा, पाहून सारेच घाबरले; नेमकं काय घडलं?

Pune News: पुण्यामध्ये रस्त्यावर मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा सांगाडा नेमका कुणाचा आहे? कुठून आला? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले होते. हा सांगाडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील रस्त्यावर मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकातील ही घटना आहे. रस्त्याच्या मधोमध मानवी हाडाचा सांगाडा पाहून सगळेच घाबरले होते. हा मानवी सांगाडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या मधोमध हा सांगाडा आढळून आल्यामुळे घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या मानवी सांगाड्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मानवी सांगाडा कुठून आला, कुणाचा आहे? याचा पोलिसांनी तपास केला. तपासातून हा मानवी सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गोल्डन आर्क लॉज समोरील नगर रोडवर हा मानवी सांगाडा आढळून आला होता. प्राप्त माहितीवरून आज दुपारी १५.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर छातीच्या आणि कमरेच्या भागाचा सांगाडा आढळून आला.

सांगाड्याची व्यवस्थित पाहणी केली असता हा मानवी सांगाडा नसून प्रयोगशाळेत वापरण्याचा आर्टिफिशल सांगाडा आढळून आला. हा मानवी सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेला आणि तारेने एकत्र बांधलेला आहे. यामध्ये संशयास्पद असे काही आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा प्रयोगशाळेतील सांगाडा इथे कसा आला आणि कुणी आणून टाकला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lion Video Viral: महाराष्ट्रातील पुरात अडकला सिंह? जीव वाचवण्यासाठी सिंहाची धडपड

POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

Palghar: तारापूर MIDC मधील कंपनीत वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू; चौघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी मोठी वाढ

Ladki Bahin Yojana: १२ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 'लाडकी'चा लाभ, शिस्तभंगाची कारवाई होणार|VIDEO

SCROLL FOR NEXT