Shocking Pune News Saam TvNews
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या नेत्यासमोर पोलिसांची दादागिरी, ग्रामस्थांना शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

Pune Police Brutality Caught on Camera: रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली PMRDA प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बळाचा वापर केला. ग्रामस्थाने विचारले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

Bhagyashree Kamble

पुण्यातील हिंजवडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. याच संदर्भात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, यात वरिष्ठ पोलिस अधिकारी एका नागरिकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता बांधकाम पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी गावात आले होते. याचा जाब विचारणाऱ्या नागरिकाला, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच धक्के मारत अटक करण्याची धमकी दिली. संबंधित व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

या सगळ्या प्रकारावर आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर घटनास्थळी उपस्थित असूनही त्यांनी पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंजवडीत पोलिस प्रशासनविरुद्ध रोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: जरांगे परत का आले? मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षणाचा चेंडू शरद पवारांनी केंद्राकडे टोलावला

... तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार, शरद पवारांनी दिले तामिळनाडूचे उदाहरण

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदावरी नदी तुडुंब, दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकरी आणि गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT