Pune Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: पुण्यात भयंकर घडलं! धरण परिसरात आढळला अज्ञाताचा मृतदेह, रात्री तरंगताना पाहून नागरिक भयभीत

Shocking Pune news: खडकवासला धरण परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसला. मृतदेह पाहताच परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • खडकवासला धरण परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

  • मृतदेह फुगलेल्या अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसला.

  • मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असल्याचा अंदाज.

  • पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून तपास सुरू.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खडकवासला धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुणे-पानशेत रस्त्यालगत सोनापूर गावाजवळील नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. सध्या अधिक तपास सुरू आहे.

अचानक पाण्यात तरंगताना मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस मृतदेहावरील कपडे आणि अंगावरील खुणा यांच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

भिवंडीतील ईदगाह रोड येथील खाडी किनारी धड नसलेला महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. महिला नेमकी कोण? याचा तपास सुरू आहे. महिलेची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरपंचाचे फिल्मी स्टाईल अपहरण; हात बांधले, ८०० किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबून ठेवलं, नेमकं काय घडलं?

Income Tax Refund: ITR फाइल केला पण रिफंड आलाच नाही? आयकर विभागाने कारणे सांगितली, वाचा

गोपीचंद पडळकर औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके अफजलखान|VIDEO

Kohinoor Diamond : मौल्यवान आणि दुर्मिळ कोहिनूर हिऱ्याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT