SHOCKING! FIVE POLICEMEN ARRESTED FOR ALLEGED FAMILY KIDNAPPING AND ₹5 LAKH EXTORTION IN PUNE saam tv
मुंबई/पुणे

रक्षकच बनले भक्षक! खंडणीसाठी पोलिसांनीच केलं अख्ख्या कुटुंबाचं अपहरण, 5 पोलिसांना अटक

Policemen Arrested In Extortion Plot: पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबाचे अपहरण करून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • पुण्यातील धक्कादायक प्रकरणात पोलिसांवरच अपहरण आणि खंडणीचा आरोप.

  • एका कुटुंबाचे अपहरण करून ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप.

  • सहा आरोपींपैकी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. या ब्रीद वाक्याचा अर्थ म्हणजे, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा (गुन्हेगारांचा) नायनाट करणे पण पुण्यातील पोलिसांचे कृत्य पाहून संपूर्ण राज्याची मान शरमेनं खाली गेली आहे. तर पोलीस विभागावरील सामन्य व्यक्तींचा विश्वास उडालाय. पोलीस गुन्हेगारांना दंड देत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देतात. पुण्यातील पोलिसांना खंडणीसाठी एका कुटुंबाचे अपहरण केलं. याप्रकरणात 6 पैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकार?

पुणे शहरातील विमाननगर परिसरात राहणारे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद हे कुटुंबासह 5 जुलैला फिरायला गेले होते. त्यादिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कामशेत परिसरात पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तुमच्या गाडीत ड्रग्ज आहेत, असं सांगून पोलिसांनी त्यांचे अपहरण केलं. त्यानंतर या पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली.

कुटुंबाची कशी झाली सुटका?

अपहरण करणाऱ्या पोलिसांना शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मोहम्मद आझमी यांच्या कुटुंबियांना रात्री आठ वाजेपर्यंत कारमध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत होते. त्यावेळी तळेगावजवळ एटी एममधून पैसे काढताना कुटुंबातील एका मुलाने हातातील स्मार्ट वॉचच्या सहाय्याने नातेवाईकांना मेसेज करून या अपहरणाची माहिती दिली.

भूषित शर्मा यांच्या कुटुंबातील एका मुलाने स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना मेसेज केला होता. आपल्यासोबत घडलेल्या अपहरणाच्या नाट्यमय घडामोडींची माहिती दिली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड पोलिसांना संपर्क केला त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.त्यानंतर पोलिसांनी आपली पथके शर्मा यांच्या शोधार्थ रवाना केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल सहा पोलिसांनी हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार त्यानंतर उघडकीस आला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहापैकी ५ पोलिसांना अटक करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या सहा पोलिसांना अटक करण्यात आलीय. पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळ अपहरणाचा हा प्रकार घडला होता.

अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे

१.पोलिस नाईक अमोल वायकर

२.पोलिस कॉन्स्टेबल अमोल ननावरे

३.पोलिस कॉन्स्टेबल तुषार धावरे

४.वॉर्डन किसन बोंबळे

५ वॉर्डन नितेश चव्हाण

६ वॉर्डन तुषार घाडगे

सहा पोलिसांना अटक करुन आज वडगाव मावळच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र पोलिसांनी त्यांची नावे एफ आय आर मधे घेतलेली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MH-CETमध्ये पर्सेंटाईल घोटाळा? 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, 13 लाखांत हवं ते कॉलेज देण्याची हमी

Maharashtra News Live Update: केसनंद ग्रामपंचायतीसमोर कचरा आंदोलन कथित भ्रष्टाचाराविरोधात अनोखा निषेध

बॉयफ्रेंडसोबत बोलताना रडायचा मुलगा; निर्दयी मायनं ३ वर्षाच्या लेकाचा दाबला गळा

Abhijeet Dipke : ...तर लवकरच मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा सरकारला गंभीर इशारा

Bhajani Thalipeeth Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा खमंग भाजणीचे थालिपीठ, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT