Mumbai kidnapping case 
मुंबई/पुणे

Mumbai : अपहरण केलं, मग अश्लील व्हिडीओ काढले अन् ६ लाख लंपास केले, मुंबईतील धक्कादायक प्रकाराचा असा झाला उलगडा

Mumbai Crime News : पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आलेय. कॉल सेंटरमधील एका कर्मचाऱ्याचं अपहरण करून सहा लाख रूपये उकळले. त्याचे नग्न फोटो काढले अन् व्हायरल करण्याची धमकी दिली.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai kidnapping case : मुंबईच्या मालवणीत कॉल सेंटर कर्मचाऱ्याचे अपहरण करून 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली मालवणी पोलिसांनी मुंबई पोलीस अधिकार्‍याच्या नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे. आरोपीने पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली. अँजल गोम्स (25) आणि आदित्य बडेकर (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादीने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मालवणी पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले.कोर्टाकडून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, २४ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता मालाड पश्चिम मालवणी, लगून रोड, महाकाली परिसरातून २५ वर्षीय तरुणाचे अपहरण केले. अपहरणकर्त्या त्या तरुणाला गोरेगाव येथील एका बांधकामाधीन इमारतीत घेऊन गेले, जिथे गांजाची पिशवी धरून नग्न अवस्थेत त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या तरुणाला सोडून दिले आणि घटनेबाबत कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. जाण्यापूर्वी त्याने पीडित तरुणाच्या खात्यातून 6 लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर केले.

अपहरण झालेला तरुण आणि गोम्स हे दोघेही एकाच कॉल सेंटर मध्ये काम करत होते. मात्र एप्रिल महिन्यात गोम्स ची नोकरी गेली त्यामुळे गोम्सला वाटले की त्याच्यामुळे आपली नोकरी गेली. त्यामुळे त्याने आपल्या एका मित्रासह योजना बनवून त्या तरुणाच्या अपहरणाचा गुन्हा घडवून आणला.

बडेकरने आपल्याला घराबाहेर पकडून ठेवल्याचेही पीडित तरुणाने सांगितले. थोड्याच वेळात गोम्स तेथे आला आणि त्या तरुणाला मारहाण करून गोरेगावच्या एका निर्माण आधीन इमारतीत नेऊन हातात गांजाची पिशवी देऊन नग्न व्हिडिओ चित्रीकरण केले. यानंतर दोघांनीही तक्रारदाराला एटीएम मध्ये नेऊन त्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले. यासंदर्भात फिर्यादीने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मालवणी पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT