Kalyan Crime: धक्कादायक! 10 वर्षांपासून आरोपी विशाल गवळी करत होता अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार

Kalyan Crime: लैंगिक अत्याचार,अल्पवयिन मुलावर लैंगिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न ,लूट ,तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे विशाल गवळीवर आहेत.
Vishal Gawali
Kalyan CrimeTimes of India
Published On

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत. पोलीस तपासादरम्यान कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत यादृष्टीने पोलीस काम करत आहेत. विशाल गवळीने प्रत्येक गुन्ह्यात मिळविलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना प्रक्रिया सुरू केलीय.

किती आरोपींना मानसिक रुग्णाचा दाखला देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी, ठाणे सिव्हील, मेंटल रुग्णालय आणि मुंबईतील रुग्णालयांना पत्र देऊन पोलिस माहिती घेणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलीय. 2014 पासून आतापर्यंत विशाल विरोधात तल अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,अल्पवयिन मुलावर लैंगिक अत्याचार ,हत्येचा प्रयत्न ,लूट ,तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी विशाल गवळीवरील आठ गुन्ह्याचे जामीन रद्द करण्याची मागणी पोलीस करणार आहेत. न्यायालयाने ज्या अटी शर्तीवर विशाल गवळीला जामीन दिला होता ,त्या अटी शर्ती न पाळता आरोपी गुन्हे करत असल्याने त्यांच्या सर्वच गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी कल्याण कोळसेवाडी पोलीस न्यायालयात प्रक्रिया सुरू करणार आहेत.

Vishal Gawali
Kalyan Crime: अपहरण करून घरात नेलं, अत्याचारानंतर निर्घृण हत्या, कल्याणच्या घटनेचा असा झाला उलगडा

विशाल गवळीवर दहा वर्षात नऊ गुन्हे दाखल आहेत. यापैकी ८ गुन्ह्यात तो जामीनावर बाहेर आहे.

2014 ते 2024 या कालावधीत विशाल गवळीवर दाखल असलेले गुन्हे

2014 मध्ये अल्पवयीन मुलाबरोबर सर्गिक अत्याचार केल्याचा 377 प्रमाणे गुन्हा दाखल आहे

2015 मध्ये हत्याचा प्रयत्न करणे .... 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे

2016 मध्ये विनयभंग करणे...354 प्रमाणे गुन्हा दाखल आहे

2019 आणि 2020 मध्ये आरोपीला तडीपरी करण्यात आली होती मात्र त्याचे देखील उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल

2021 मध्ये विनयभंग करणे...354 प्रमाणे गुन्हा दाखल आहे

2022 मध्ये जबरी चोरी .......

2023 मध्ये विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आणि आत्ता 2024 मध्ये अल्पवयीन मुलीवर अपहरण, लैंगिक अत्याचार , हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com