Railway TC Molests 7-Year-Old at Kasara Station; FIR Filed Saam Tv News Marathi
मुंबई/पुणे

धक्कादायक! कसारा स्थानकात रेल्वेच्या टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग, आईची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Kasara Station : कसारा स्थानकात ७ वर्षांच्या मुलीचा रेल्वे टीसीकडून विनयभंग; आईने उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल, पोलिसांनी आरोपीवर कारवाई सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

Railway TC Molests 7-Year-Old at Kasara Station; FIR Filed : कसारा रेल्वे स्थानकात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रेल्वेमधील टीसीकडून ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तिकिट पाहण्याच्या बहाण्याने टीसीने आईसमोरच चिमुकलीचा विनयभंग केला. याप्रकरणी आईने उपमुख्यमंत्र्यासह रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. टीसीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून रेल्वे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कसारा स्थानकात उतरलेल्या मायलेकीला टीसीने तिकीट विचारले. या दरम्यान तिकीट तपासणीच्या बहाण्याने संबंधित टीसीने 7 वर्षीय चिमुरडीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार चिमुरडीच्या आईने केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी रमेशकुमार शर्मा या टीसी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून १२ जून रोजी कसारा लोकलने एक महिला आपल्या सात वर्षाच्या मुलीसोबत कसारा स्थानकात उतरली. स्थानकात उतरल्यानंतर रमेशकुमार या टीसीने या महिलेकडे तिकीटाची मागणी केली. महिला पर्समध्ये तिकीट शोधत असताना रमेश याने आईजवळ उभ्या असलेल्या ७ वर्षाच्या चिमुरडीला जवळ ओढलं. आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला.

या प्रकरणी आईने उपमुख्यमंत्री कार्यालयात पत्र धाडत आपल्या मुलीबरोबर घडलेल्या घटनेतील आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून या घटनेची तातडीने दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधत या प्रकरणी रमेश शर्मा या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT