Virar Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २ मित्रांनी उडी मारली, सामूहिक आत्महत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

virar two friends death: विरारमध्ये दोन मित्रांनी सामूहिक आत्महत्या केली. इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली. या घटनेमुळे विरारमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • विरारच्या बोळींज परिसरात दोन मित्रांनी सामूहिक आत्महत्या केली.

  • निर्माणाधीन इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारत त्यांनी आत्महत्या केली.

  • हे दोघे तरुण नालासोपारा परिसरातील रहिवासी होते.

  • दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांच्या आत्मत्येचे कारण अस्पष्ट आहे.

मनोज तांबे, विरार

विरारमध्ये दोन मित्रांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या बोळींज परिसरात ही घटना घडली. दोघांनी इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. दोघांच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलं नाही. विरार पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे विरारमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या बोळींज येथील अंडर कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून दोन तरुणांनी उडी मारली. दोघेही मित्र होते. सोमवारी रात्री ते इमारतीवर गेले. त्यांनी टोकाचे पाऊल उचलत इमारतीवरून उडी मारली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. श्याम सनद घोरई (२० वर्षे) आणि आदित्य रामसिंग (२१ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण नालासोपाराच्या आचोळे परिसरात कुटुंबीयांसोबत राहत होते. ते महाविद्यायीन विद्यार्थी होते. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही हत्या की आत्महत्या? याचा शोध अर्नाळा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT