Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : आधारला मतदान कार्ड लिंक करताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पोलिसात गुन्हा दाखल

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai News : सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देशभरातील प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तींचे आधार कार्ड व मतदार कार्ड लिंक करण्याचे काम सुरू केले आहे. (Latest Marathi News)

हे काम सुरू असतानाच मुंबईच्या कुरार भागातील पिंपरी पाडा येथील एक व्यक्तीचे मतदार कार्ड संशयास्पद रित्या आढळून आले. याची खातरजमा केली असता ते बोगस असल्याचे सिद्ध झाल्यामुळे मुंबईच्या कुरार पोलीस ठाण्यामध्ये हे बोगस मतदार कार्ड तयार करून देणाऱ्या केंद्र चालका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान कार्ड (voter id) हे विशाल भारतीय नावाच्या व्यक्तीच्या मालाड पूर्वेकडील पिंपरी पाडा येथील डिजीटल सेवा कमन सर्विस सेंटर (वसुधा केंद्र) येथून बनवुन घेतले असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, 159 दिंडोशी विधानसभा क्षेत्रात नायब तहसीलदार मंजुषा रसाळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून कुरारगाव, संतोष नगर, म्हाडा वसाहत, नागरी निवारा, गोरेगाव पूर्व भागात घरोघरी जाऊन ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

दिंडोशी मतदारसंघातील पिंपरी पाडा परिसरात केंद्रस्तरीय अधिकारी संतोष कांबळे हे दिनांक 7 फेब्रुवारी 2022 या दिवशी घरोघरी जाऊन आधार कार्ड व मतदान ओळखपत्र लिंक करण्याचे काम करत असताना त्यांना प्रेमलाल शर्मा यांच्या नावाचे बनावट मतदान कार्ड असल्याचा संषय आला. (Mumbai News)

शहानिशा करण्यासाठी नायब तहसीलदार मंजुषा रसाळ यांना भेटून कार्यालयातील संगणक ऑपरेटर अंकीत शिखरे यांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेब साईटवर प्रेमलाल या नावाचे मतदार ओळखपत्राची पडताळणी करण्यास सांगितले मात्र या वेबसाईटवर या संदर्भात कसलीच माहिती उपलब्ध झाली नाही यामुळे कांबळे यांचा संशय खरा ठरला.

यानंतर प्रेम लाल राजाराम शर्मा यांना नायब तहसीलदार यांनी आपल्या कार्यालयात बोलावून बोगस मतदार संदर्भात विचारपुस केली. हे बनावट मतदान कार्ड विशाल भारतीय नावाच्या व्यक्तीच्या डिजीटल सेवा कमन सर्विस सेंटर मध्ये बनवल्याचे शर्मा यांनी नायब तहसीलदार यांना सांगितले.

यानंतर अधिक खात्री करून घेण्यासाठी नायब तहसीलदार यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवुन 9 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान कार्ड बनविण्यासाठी डिजीटल सेवा कमन सर्विस सेंटर येथे पाठवले. बोगस ग्राहक रुचिक गोदावरी या यांनी अरुण बाळू सुर्वे यांचे नावाचे आधार कार्ड दाखवून मतदान कार्ड बनवून देण्यास सांगितले. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन स्लीपची प्रिंट काढुन दिली व जाण्यास सांगीतले.

त्याच दिवशी अरुण बाळू सुर्वे यांचा ऑनलाईन अर्ज 159 दिंडोशी विधानसभा येथे प्राप्त झाला. मात्र तो कारवाईच्या उद्देशाने रद्द करण्यात आला होता. पुन्हा 20 मार्च या दिवशी बोगस ग्राहक रुचिक गोदावरी या वसुधा केंद्र चालकाकडे आपले मतदार कार्ड मागण्यासाठी गेले असता तुमचे मतदार कार्ड रिजेक्ट झाले असल्याचे सांगितले.

मात्र तुम्ही जर पाचशे रुपये दिले तर तुम्हाला त्वरित मतदार कार्ड काढून दिले जाईल असे सांगताच वृचिक यांनी केंद्र चालकाला पाचशे रुपये देताच अरुण बाळु सुर्वे नावाचे मतदार ओळखपत्र बनवुन प्रिंट दिली.

यानंतर रूचीक गोदावरीया यांनी हे कार्ड आपल्या अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर त्या कार्ड वरील निवडणूक अधिकाऱ्याची बनावट सही देखील पाहायला मिळाली यानंतर नायब तहसीलदार मंजुषा रसाळ यांनी वसुधा केंद्र चालक विशाल भारतीय याच्या विरोधात नागरिक व सरकारची फसवणूक केल्या विरोधात कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यानंतर कुरार पोलिसांनी विशाल भारतीय याच्या विरोधात भादवि कलम 420, 468 आणि 471 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT