nagpur News  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

Nagpur Shocking : 45 प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला अचानक आग लागली. या घटनेने प्रवाशांची एकच धावाधाव झाली.

Vishal Gangurde

धावत्या वाहनांता आग लागण्याच्या घटनेत वाढ

नागपुरातही धावत्या खासगी बसला आग

बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये खळबळ

पराग ढोबळे, साम टीव्ही

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. नागपूर उमरेड मार्गावरही एका धावत्या खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपुरातील IT कॉलेज ते उकळवाही हेटीदरम्यान ही घटना घडली. बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. बसला आग लागल्याची माहिती मिळताच सर्वांची धावाधाव झाली. सर्व जण तातडीने एकाच वेळी बसमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचं कळताच चालकाने तातडीने बस थांबवत आणि प्रवाशांना बाहेर काढले. आग लागल्यानंतर काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे आग विझविण्यात यश आलं.

अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. घटनेचा अधिक तपास कुही पोलीस तपास करत आहेत. धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यात पहाटे अपघाताचा थरार

पुण्यात पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यातील येरवडा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ वाहनाचा अपघात झाला. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात नेमके किती जणं जखमी झाले आहेत हे समजू शकलेले नाही. एका भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाचा हा अपघात झाल्याचे समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर चाकणमध्ये वाहतूककोंडी

Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

Jalna Politics: वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती; बुलढाण्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जालन्यात टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT