MNS Workers Beat Migrant Accused of Harassing Girl in Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: आधी मुलीची छेड काढली, नंतर लिफ्टमध्ये डांबून ठेवलं; परप्रांतीयाला मनसैनिकांनी दिला चोप| VIDEO

MNS Workers Beat Migrant Accused of Harassing Girl: पुण्यात मुलीची छेड काढणाऱ्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने मुलीला लिफ्टमध्ये देखील कोंडून ठेवले होते. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळत आहे. या मुजोर परप्रांतीयांना मनसेकडून धारेवर धरले जात असून त्यांना धडा शिकवला जात आहे. अशातच पुण्यामध्ये एका परप्रांतीय तरुणाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. छेड काढल्यानंतर या तरुणाने या मुलीला लिफ्टमध्ये डांबून ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थिनीची छेड काढून तिला लिफ्टमध्ये अर्धा तास डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. क्लासमधील परप्रांतीय कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केले.

परप्रांतीयाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची माहिती मिळताच मनसैनिकांनी क्लासेसमध्ये धाव घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी या परप्रांतीय तरुणाला जाब विचारत त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT