Pune Politics: पुण्यात काँग्रेसला धक्का; संग्राम थोपटेंच्या हाती कमळ,बदलली राजकीय समीकरणं

Sangram Thopte Joins BJP : पुण्यात काँग्रेसला हादरा देत माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मात्र थोपटेंनी काँग्रेस का सोडली? थोपटेंच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात नेमकी कोणती समीकरणं बदलणार आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Maharashtra Politics
Sangram Thopte Joins BJPsaam tv
Published On

मस्कर , साम प्रतिनिधी

हे आहेत काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या तंबूत दाखल झालेले संग्राम थोपटे, पुण्याच्या राजकीय वर्तुळात दबदबा असलेल्या अंनतराव थोपटें यांचा मुलगा. अखेर काँग्रेसवरची निष्ठा सोडून संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केलाय. मात्र यावेळी संग्राम थोपटेंनी स्वत:वर आणि वडील अनंतराव थोपटेंवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचलाय. नेमकं काय म्हणालेत संग्राम थोपटे ऐका.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसतायत.त्यात संग्राम थोपटेंच्या पक्षप्रवेशानंतर आता पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. भाजपनं राजकीय खेळीनं आणखी एक राजकीय घराणं गळाला लावलंय. मात्र तीनवेळा आमदार राहीलेल्या संग्राम थोपटेंच्या मातब्बर घराण्यानं अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली. पाहूया.

थोपटेंच्या पक्षांतराची कारणे

थोपटेंच्या मालकीचा राजगड सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत

कारखान्याला राज्य सरकारक़डून 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर

लोकसभेत थोपटेंकडून सुप्रिया सुळेंचं काम,अजित पवारांकडून कर्ज रद्द केल्याची चर्चा

विधानसभेत थोपटेंचा पराभव,काँग्रेसनं सहकार्य न केल्याचा थोपटेंचा आरोप

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरेंनंतर पवार कुटुंब एकत्र येणार? शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

गेल्या काही दिवसांपासून आक्रमक राजकारण करत भाजपनं सहकार क्षेत्राशी संबधित राजकीय घराण्यांना आपल्या वळचणीला आणलंय. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी थोपटेंच्या भाजप पक्षप्रवेशावर सवाल उपस्थित केलाय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: महायुतीत महायुद्ध? भाजपनं दाखवला २३७ चा आकडा; नंतर शिंदे गटाच्या आमदाराने अतुल सावेंना खडेबोल सुनावले

भाजपच्या आक्रमक राजकारणानं गेल्या काही दिवसात राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात राजकीय उलथापालथ झालीये. या मालिकेत आता थोपटे घराणंही भाजपच्या वळचणीला गेलय. त्याशिवाय मोहिते,घाटगे घराणंही भाजपसोबत आहे.

राजकीय फायदा नको मात्र सहकारातील वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न ही घराणी करताना दिसतात. तर दुसरीकडे घराणेशाहीला विरोध करणारा भाजपच घराणेशाहीचा राखणदार होतोय का? असा प्रश्न निर्माण झालाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com