Maharashtra Politics: ठाकरेंनंतर पवार कुटुंब एकत्र येणार? शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

Sharad Pawar- Ajit Pawar: ठाकरेंनंतर आता पवार कुटुंबही एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्यामागची कारणं काय आहेत? खरंच पवार कुटुंब एकत्र येणार का? आणि पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.
Maharashtra Politics
Sharad Pawar- Ajit Pawarsaam tv
Published On

हा व्हिडीओ पाहा. लोकसभेला विरोधात काम तर विधानसभेला थेट काका अजित पवारांविरोधात निवडणूक लढवणारे युगेंद्र पवार हे सुनेत्रा पवार समोर येताच त्यांच्या पाया पडले. यावेळी सुनेत्रा पवारांनीही राजकीय कटूता विसरत पुतण्या युगेंद्रची गळाभेट घेतली. एवढंच नाही तर विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवारांसह सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार शेजारी बसल्याचं दिसतंय.

हा दुसरा व्हिडीओ पाहा, हा व्हिडीओ आहे पुण्यातील बैठकीचा यावेळी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांमधील वाढत्या भेटीगाठी आणि पवार कुटुंबात वाढत चाललेल्या जवळीकीवर शरद पवारांनी आपली भूमिका मांडलीय. तर दुसरीकडे युगेंद्र पवारांनी मात्र पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी बोलताना रक्ताच्या नात्याचा दाखला दिलाय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: महायुतीत महायुद्ध? भाजपनं दाखवला २३७ चा आकडा; नंतर शिंदे गटाच्या आमदाराने अतुल सावेंना खडेबोल सुनावले

खरंतर पवार कुटुंबातील भेटीगाठींची ही पहिलीच वेळ नाही. तर विधानसभा निवडणुकीनंतर बैठकांचा अक्षरशः सिलसिलाच सुरु झालाय.

काका-पुतण्या भेटी-गाठी

12 डिसेंबर 2024

वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट

23 जानेवारी 2025

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा

22 मार्च 2025

अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र

10 एप्रिल 2025

जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र

12 एप्रिल 2025

रयतच्या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र

21 एप्रिल 2025

'कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरील बैठकीत काका-पुतण्या एकत्र

Maharashtra Politics
Sharad Pawar-Ajit Pawar: काका-पुतण्याची वारंवार भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

फक्त बैठकाच नाही तर अजित पवारांनीही शरद पवारांशी जवळीक वाढवणारे भावनिक वक्तव्य केल्याचं दिसून आलंय. एकीकडे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा आहे.. तर आता ठाकरेंपाठोपाठ पवार कुटुंबही प्रादेशिक अस्मितेसाठी एकत्र येत भाजपला आव्हान देणार का? याचीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com