धक्कादायक! नऱ्ह्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार
धक्कादायक! नऱ्ह्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! नऱ्ह्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील नऱ्हे (Narhe) परिसरामध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैगिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका ३० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार केले आहेत. सदर प्रकरणात सिंहगड रोड (Sinhgad Road) पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर हंगरगे (वय 30, रा.नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Rape On Minor Girl In Narhe, Pune)

हे देखील पहा :

मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन (Minor Girl) मुलगी ही नव्या वर्गात शिकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. याच काळात पीडित मुलीला तिच्या आई - वडिलांनी ऑनलाईन लेक्चर्ससाठी मोबाईल घेऊन दिला होता. आरोपीने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संवाद साधून ओळख वाढवली. आरोपीने वारंवार पीडित मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर तुझ्यासह तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अश्या धमक्या पाठवल्या.

आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीवर सप्टेंबर 2021 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. घाबरलेल्या मुलीने प्रकाराबाबत तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी तात्काळ पीडित सिंहगड रोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नऱ्हे पोलीस चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. पीडित मुलीच्या मुलीच्या फिर्यादीवरून दि. 20 मार्च 2022 रोजी रात्री उशिरा संबंधित नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर तातडीने कार्यवाही करत पोलीसांनी आरोपी रामेश्वर हंगरगे याला अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्र राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

Hyundai च्या या कार्समध्ये मिळतं CNG इंजिन, 27 किमीचा देतात मायलेज; पाहा लिस्ट

Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

SCROLL FOR NEXT