Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : मित्राच्या बहिणीसोबत अश्लील चॅटिंग; संतापलेल्या दोस्ताने दगडाने ठेचून केला खून

Ambegaon Budruk crime news update : पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये तरुणाने मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील चॅटिंग केल्याने संतप्त मित्राने त्याचा दगडाने ठेचून खून केला. आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune youth murdered over vulgar Instagram chat with friend’s sister : मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरूणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये घडली. रोहित धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे, तर सूरज गणेश सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सूरज गणेश सूर्यवंशी याला मध्य प्रदेशातून आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून तिच्यासोबतच अश्लील चॅटिंग करणाऱ्या रोहित धुमाळ याचा खून करण्यात आला. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. खून करून पळून गेलेल्या आरोपीला आंबेगाव पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. याबाबत दीपक यानं पोलिसात फिर्याद दिली होती. प्राथमिक माहितीनुसार, दीपक, सूरज आणि रोहित हे तिघेही मित्र होते. रोहित याने मित्राच्या बहिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केले होते अन् तिच्यासोबतच अश्लील चॅटिंग करत होता. त्यामुळे संतापून त्याचा खून करण्यात आला.

आंबेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि सुरज मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने सूरज याच्या मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. आणि या अकाउंट वरून तो तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग करत होता. मित्राच्या बहिणीने हा संपूर्ण प्रकार सुरज याला सांगितला. त्यानंतर सुरजने अकाउंटवर इंस्टाग्राम कॉल केला असता तो रोहितने उचलला. १५ जून रोजी मयत रोहित, आरोपी सुरज आणि फिर्यादी दीपक तिघे कात्रज परिसरातील जांभुळवाडी तलावावर एकत्र जमले होते. यावेळी रोहित आणि दीपक यांच्या मित्राच्या बहिणी वरून भांडण झाले. रागाच्या भरात सूरजने दगडाने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा मृत्यू झाला. या प्रकरणी सूरजला अटक करण्यात आली. आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT