धक्कादायक: C.I.D. मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केला ७० वर्षीय वृद्धेचा खून... Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक: C.I.D. मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केला ७० वर्षीय वृद्धेचा खून...

'सीआयडी' (C.I.D.) मालिका पाहून त्यामधील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी (minor boys) सिंहगड रस्त्यावरील वृद्ध महिलेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: 'सीआयडी' (C.I.D.) मालिका पाहून त्यामधील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी (minor boys) सिंहगड रस्त्यावरील वृद्ध महिलेचा खून (murder) केल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी टी.व्ही. पाहत बसलेल्या महिलेल्या पाठीमागून धक्का देत खाली पाडले. यानंतर महिलेचे तोंड, नाक दाबून तिचा खून करून घरातील ऐवज चोरून पसार झाले होते. घटनास्थळी बोटांची ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हॅण्डग्लोज घातलेले होते. सिंहगड पोलिसांनी (SinghGad Police) शिताफीने तपास करीत दोघांना ताब्यात घेतले आहे. (Shocking: C.I.D. After watching the series, minors killed a 70-year-old women)

हे देखील पहा -

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे खूर्द मधील सायली हाईट्स याठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ महिलेचा खून करून घरातील सोने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. शालीनी बबन सोनवणे (७० रा. सायली हाईटस हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्यासह तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तसेच, प्रत्यक्षदर्शी नसल्याने घटनेचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास सुरू होता.

या दरम्यान मंगळवारी (दि.२) तपास पथकातील पोलीस अंमलदार उज्जव मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिर येथील लहान मुलांकडुन माहिती मिळाली की, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. यावरून पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये दोन मुले अत्यंत घाई-गडबडीत निघून जात असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली. त्यावेळी दोन्ही मुलांनी चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता यातील एका मुलाला स्वःतच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

काही दिवसांपुर्वीच चोरली होती चावी

खून झालेल्या महिलेच्या घरालगतच ही अल्पवयीन मुले राहत होती. त्यामुळे त्यांचे महिलेच्या घरी कायम येणे जाणे असायचे. महिलेकडे पैसे असून ते पैसे कुठे ठेवतात, याबाबत त्यांना माहिती होती. यासाठी या दोघांनी दोेन महिन्यांपुर्वी सीआयडी मालिका (C.I.D.) पाहून चोरीचा कट रचुन महिलेच्या घराची चावी चोरली होती. परंतु संबधीत महिला वयस्कर असल्याने घर सोडुन कुठेही जात नसल्याने त्यांना चोरी करता आली नाही.

मात्र, ३० तारखेला महिला घरात एकट्या असताना त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी महिला टी.व्ही. पाहत होत्या. महिलेसोबत या दोघांनीही टी.व्ही पाहण्याचा बनाव केला. काही वेळात महिलेला पाठीमागून धक्का देत खाली पाडले. यानंतर महिलेचे तोंड व नाक दाबून खून केला व घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

SCROLL FOR NEXT