Dombivli News  AI Image
मुंबई/पुणे

Shocking : ब्रेकअपचा राग अनावर! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचं घर पेटवलं; डोंबिवलीत खळबळ

Dombivli Crime News : डोंबिवलीत प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून प्रेयसीच्या घराला आग लावल्याचा आरोप. मानपाडा पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली. तरुणीसह आई-वडिलांचा बचाव.

Alisha Khedekar

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. प्रेयसीने नातं संपवण्यास सांगितल्याचा राग मनात ठेवून तरुणाने तिच्या घराला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या आगीत तरुणीसह तिचे आई-वडील बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका वस्तीमध्ये राहणाऱ्या तरुणीचे दीपेश रस्तोगी याच्यासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला दोघांमध्ये चांगले संबंध होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात मतभेद होऊ लागले. वारंवार होणाऱ्या वादांमुळे तरुणीने हे नातं पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने याबाबत दीपेशला स्पष्टपणे सांगितले होते.

मात्र, प्रेयसीचा हा निर्णय दीपेशला मान्य नव्हता. अनेक वर्षांचे नाते संपणार असल्याने तो संतापला होता. याच रागातून त्याने प्रेयसीच्या घराला आग लावल्याचे समोर आले आहे. अचानक घराला आग लागल्याने घरातील सदस्यांची मोठी धावपळ उडाली. आगीमुळे तरुणी आणि तिच्या आई-वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

मात्र, तिघांनीही या संकटातून स्वतःचा बचाव केला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर दीपेश रस्तोगी याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीने घराला आग नेमकी कशी लावली, यामागे आणखी काही कारण होते का आणि या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या मानपाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अक्कलकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, दोन दुकानातून रोकड केली लंपास

महिलांसाठी सॉफ्ट सिल्कच्या साड्या , लेटेस्ट ट्रेडिग 5 डिझाईन्स

Relationship Age Gap : प्रेमाला वय नसतं, पण...हेल्दी रिलेशनशिपसाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या वयात किती अंतर असावं?

IND vs NZ Test: टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक कारनामा, 150 वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी विक्रमी कामगिरी; न्यूझीलंडही चक्रावलं!

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ३ आठवडे संपले, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT