Manasvi Choudhary
फॅशन दुनियेत सिल्क साड्या कायमच ट्रेडिंगमध्ये असतात. तुम्हालाही सिल्क साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्सच्या साड्या निवडा.
सॉफ्ट सिल्कमध्ये या साड्या अत्ंयत सुंदर असतात. सॉफ्ट सिल्क साड्या या मऊ आणि कम्फर्टेबल असतात.
सणासुदीला किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सॉफ्ट सिल्कच्या साड्या निवडू शकता. सॉफ्ट सिल्क साड्यांमध्ये तुम्ही डार्क रंगाऐवजी पेस्टल शेड्सच्या साड्या निवडा. या साड्या खुपच सुंदर दिसतात.
सॉफ्ट सिल्क साड्यांना चंदेरी आणि सोनेरी जरी वर्क बॉर्डर असते. ती साडीची शोभा वाढवते.
कांजीवरम सॉफ्ट सिल्क साड्या या तुम्ही लग्नकार्यासाठी निवडू शकता.कांजीवरम साड्यांचे कापड मऊ असते. त्यामुळे या साड्या नेसण्यासाठी कम्फर्टेबल असतात.
तुम्हालाही अस्सल पारंपारिक लूक करायचा असेल तर तुम्ही बनारसी सॉफ्ट सिल्क साडी निवडा. या साड्यांमध्ये अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स आहेत. बनारसी सॉफ्ट सिल्क साड्यांमध्ये रंगीबेरंगी धाग्यांचे वर्क केलेले असते.
सॉफ्ट सिल्क पैठणी साडी ही अत्यंत सुंदर दिसते. खास मराठमोळ्या लूकसाठी तुम्ही या साडीची निवड करू शकता. सॉफ्ट सिल्क पैठणी साडीच्या पदरावर मोर, पोपट आणि कमळाचे डिझाईन असते.
तुम्हाला दोन रंगामध्ये साडी हवी असेल तर तुम्ही खास दोन रंगामध्ये असणारी साडी निवडू शकता. या साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स असतात.