Washing Machine Cleaning Tips: वॉशिंग मशीन स्वच्छ कशी करायची? कपड्यांची दुर्गंधी आणि घाण घालवण्यासाठी पाहा 5 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

वॉशिंग मशीन

कपडे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. परंतु वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्याने नीट स्वच्छ होत नसतील , कपड्यांना दुर्गंधी येत असेल तर तुम्ही वॉशिंग मशीन स्वच्छ आहे की नाही याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

Washing machine

वॉशिंग मशीनची स्वच्छता

महिनोमहिने कपडे धुण्यासाठी मशीन वापरल्याने मशीनमध्ये डिटर्जंट, कपड्याचे धागे, धूळ आणि ओलावा साचून राहू शकतो आणि त्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते म्हणून यासाठी वॉशिंग मशीन स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

Washing Machine Cleaning Tips

कोमट पाण्याने स्वच्छ धुवा

महिन्यातून किमान एकदा वॉशिंग मशीन रिकामी ठेवून कोमट किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे वॉशिंग मशीनचा ड्रम आणि पाईप्समध्ये साचलेले डिटर्जंट, तेलकटपणा आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.

Clean Warm Water

रबरी डोअर सील स्वच्छ करा

फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये रबरी डोअर सील (Rubber Door Seal) असते, ज्याच्या घड्यांमध्ये केस, डिटर्जंट आणि ओलावा सहज जमा होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास तिथे बुरशी व घाण वाढू शकते. हा भाग साबणाच्या पाण्याने किंवा योग्य क्लिन्झरने व कापडाने स्वच्छ पुसून घ्या.

Clean the Rubber Door Sea

डिटर्जंटचा ड्रॉवर स्वच्छ करा

वॉशिंग मशीनमधील डिटर्जंट ड्रॉवर काढून स्वच्छ करणे शक्य असल्यास, तो काढून कोमट साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. कोपऱ्यातील आणि आतली घाण काढण्यासाठी लहान ब्रशचा वापर करा आणि ड्रॉवर कोरडा करून पुन्हा बसवा.

Clean the Detergent Drawer

वॉशिंग मशीन डोअरची स्वच्छता व हवा खेळती ठेवणे

वॉशिंग मशीनमधून ओलावा बाहेर पडू शकत नसल्यामुळे आतमध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतो. अशा वेळी कपडे धुवून झाल्यानंतर मशीनचा डोअर काही वेळ उघडा करून ठेवावा, जेणेकरून आतील भाग कोरडा राहील.

Keep the Washing Machine Door Open After Washes

फिल्टर आणि ड्रेन नियमितपणे स्वच्छ करा

वॉशिंग मशीनमध्ये सहसा एक ड्रेन फिल्टर असतो, जो केस आणि कचरा गोळा करतो. जर फिल्टर चोक झाला, तर साचलेले पाणी जमा होते आणि दुर्गंधी येते. यासाठी दर महिन्यांनी फिल्टर काढून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

Clean the Filter and Drain Regularly

NEXT: महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही 5 कामे करू नये

5 things women should not do after morning | Ai
येथे क्लिक करा...