Maharashtra Political news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या आमदारावर हल्ला; तोंडाला रुमाल बांधून आलेल्यांकडून कारवर दगडफेक

Maharashtra Political News : अजित पवार गटाच्या आमदारावर हल्ला झाल्याची घटना घडलीये. तोंडाला रुमाल बांधून आलेल्यांकडून कारवर दगडफेक करण्यात आलीये.

विजय पाटील

आमदार इद्रिस नायकवडी यांच्या कारवर दगडफेक

हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते

घटनेने स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय

सांगलीत अजित पवार गटाच्या आमदाराच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर कारवर अज्ञातांकडून दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकीदरम्यान ही घटना घडली. दगडफेकीच्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय नेत्यांची धावपळ वाढली आहे. विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. सांगलीतही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली.

नेमकं काय घडलं?

सांगलीतील मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकीदरम्यान रस्त्यावर कारने जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. आमदार इद्रिस नायकवडी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दोघे एकत्र दुसऱ्या गाडीतून निघाले होते. त्यावेळी मागे असणाऱ्या नायकवडी यांच्या कारवर दगडफेक झाली. दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांकडून दगडफेक करण्यात आली.

आमदारांच्या कारवर कोणत्या कारणातून दगडफेक झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या दगडफेकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दगडफेकीमुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचत कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवण्याचा आल्याची माहिती समोर आलेली नाही.

डोंबिवलीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कारची तोडफोड

डोंबिवलीत पैशांच्या देवाण घेवाणीवरून ठाकरे गट पदाधिकारी सुजल म्हात्रे यांना अडवून त्यांच्या कारची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या शांताराम परिसरात धक्कादायक प्रकार घडला. भररस्त्यात संपूर्ण प्रकार घडला. राडा करणाऱ्या रोहन म्हात्रे, रोमेश म्हात्रे,रुचित म्हात्रे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोडफोड करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT