Sanjay Raut: ShivSena's grand press conference at 4 o'clock ...  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: “सौ सोनार की एक लोहार की” - शिवसेनेची ४ वाजता ग्रॅण्ड पत्रकार परिषद...

Sanjay Raut: ईडीचा (ED) गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून वाढला आहे. भाजपचे केंद्रातील सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं कालच जाहिर केलं होतं. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या खासदारांसह अनेक नेत्यांना या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेपुर्वी राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत “सौ सोनार की एक लोहार की” असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. (ShivSena's grand press conference at 4 o'clock said Sanjay Raut)

हे देखील पहा -

शिवसेनेआधी ईडीनेच केला सर्जिकल स्ट्राईक:

ईडीचा (ED) गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुंबई (Mumbai) आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापासत्र सुरु केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत हे मुद्दे महत्वाचे असू शकतात:

- ईडीचा केंद्र सरकारकडून होणारा वापर

- किरीट सोमय्यांचे शिवसेनेवर आरोप

- आज मुंबईत ईडीकडून झालेली छापेमारी

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून KKR मध्ये जाणार का? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

Kalyan Dombivli : गोळीबाराचा वाद विरला? भाजप आमदार आणि महेश गायकवाड एकत्र, कल्याणसाठी शिंदे-भाजपचा फॉर्म्युला ठरला?

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

SCROLL FOR NEXT