Durga Bhosle-Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

Durga Bhosle-Shinde News : युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; ठाण्यातील कालच्या मोर्चात होत्या सहभागी

Durga Bhosle-Shinde News : वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : राजकीय वर्तुळातून अत्यंत दु:खद घटना समोर येत आहे. युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

शिवसेना युवासेना परिवाराच्या एक हरहुन्नरी कर्तुत्वान महिला अशी त्यांची ओळख होती. दुर्गा या काल ठाण्यातील (Thane) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात देखील सहभागी झाल्या होत्या. मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत त्या सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या. (Latest Marathi News)

मोर्चात चालत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. (Latest News Update)

त्यांच्या निधनाचा वार्ता समजल्यानंतर युवासेना पदाधिकार, कार्यकर्ते यांच्यासह सर्वांनाचा धक्का बसला आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मुंबईतील राहत्या घरातून संध्याकाळी 6 वाजता निघेल. तर अंत्यसंस्कार बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे होणार आहेत.

आदित्य ठाकरेंना व्यक्त केल्या भावना

दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवा सैनिक आम्ही आज गमावला. युवासेनेतलं हे दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. ओम शांती, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT