Yashwant Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

Yashwant Jadhav Income Tax Raid: शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाची धाड, नेमके आरोप काय?

त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर नुकतीच ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली. त्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा हा शिवसेनेच्या दिशेने वळवल्याचं चित्र आहे. शुक्रवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांच्या घरावर धाड टाकली. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही (Shivsena Yashwant Jadhav Income Tax Raid What Exactly Are The Allegations).

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत. मंत्रालाशेजारी जेव्हा नवाब मलिकांसाठी महाविकास आघाडीने आंदोलन केले होते, त्या आँदोलनातही यामिनी जाधव या उपस्थित होत्या.

यशवंत जाधव यांच्यावरील आरोप काय?

यशवंत जाधवांवर 15 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. हे 15 कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

मलिकांनंतर आता निशाणा शिवसेना?

नवाब मलिकांनंतर आता शिवसेनेचा (Shivsena) नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा शिवसेनेसाठी तसेच, महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते याला कसं उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT