uddhav thackeray group saamana editorial Criticism pm narendra modi Government  Saam TV
मुंबई/पुणे

Politics News: मोदी पूर्णपणे अपयशी पंतप्रधान, विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे; ठाकरे गटाची बोचरी टीका

Shivsena Latest News: मोदी हे पूर्णपणे अपयशी पंतप्रधान आहेत. त्यांनी निर्माण केलेले विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Satish Daud

Saamana Editorial on Narendra Modi

मोदी हे पूर्णपणे अपयशी पंतप्रधान आहेत. त्यांनी निर्माण केलेले विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे सध्या विकास, लोककल्याण, गरिबी हटवण्यावर बोलू लागले आहेत. त्यांचे बोलणे वरवरचे आहे, पण देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"मोदी यांनी देशाची सूत्रे 2014 साली हाती घेतली तेव्हा देशावर 49 लाख कोटी कर्ज होते. 2024 साली कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर जाऊन पोहोचला, पण या कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळाले? देशातील मोठा वर्ग गरिबी, बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे व महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फोल ठरली आहे", असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून (Shivsena News) लगावण्यात आलाय.

"मोदी पंतप्रधान (Narendra Modi) झाले तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया 58 इतका होता, तर आता 85 इतका घसरला. ही एक प्रकारे देशाची घसरगुंडीच आहे, अशी आकडेवारी देखील सामना अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. मोदी यांनी 85 कोटी गरीबांना माणसी पाच किलो फुकट रेशन देण्याचा निर्णय घेतला. गरीबांना काम न देता ऐतोबा बनवण्याचा हा प्रकार आहे".

"लोकांना फुकट धान्य द्यायचे आणि त्या बदल्यात धान्यांच्या गोणींवर स्वतःचा फोटो छापून घ्यायचा. देशात आजही 35 कोटी बालके कुपोषित आहेत. मोदी त्यांच्या या अपयशाविषयी काहीच बोलताना दिसत नाहीत. मोदी यांना सामाजिक भान नाही", अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

"मोदी यांना अर्थशास्त्र अजिबात कळत नाही. मोदी हे व्यापारी आहेत असे ते स्वतःच सांगतात, पण स्वतःचा गल्ला मोजणे वेगळे व देशाला आर्थिक दिशा देणे वेगळे. मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत जो लहरीपणा दाखवला तो धक्कादायक आहे", असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"मोदी काळात रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आली. नोटाबंदीसारखे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेला पूर्णपणे अंधारात ठेवले गेले. मोदी यांनी मूठभर उद्योगपतींची 16 लाख कोटींची बँक थकबाकी एका झटक्यात माफ केली. हा निर्णय अर्थव्यवस्थेला दुबळे करणारा होता. 16 लाख कोटी हा आकडा लहान नाही, पण मोदींनी हे उद्योगपतींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ते बोलायला तयार नाहीत", असा घणाघातही सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT