Sanjay Raut Meets Raj Thackeray Saam
मुंबई/पुणे

MNS-Shivsena: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा; लवकरच युतीची घोषणा होणार

Sanjay Raut Meets Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे-शिवसेना युतीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

Summary -

  • संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट

  • शिवतीर्थ निवासस्थानी २० मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

  • जागावाटपाच्या तिढ्यावर तोडगा काढण्याचा शेवटचा प्रयत्न

  • मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांमधील ही त्यांची तिसरी भेट आहे. शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची महत्वाची बैठक झाली. २० मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागा वाटपाच्या तिढ्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. चर्चा झाल्यानंतर शिवतीर्थवरचा निरोप घेऊन संजय राऊत मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे- शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पण जागावाटपाबाबत पेच निर्माण झाला होता तो पेच आजच्या दोन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये दूर करण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर संजय राऊत निरोप घेऊन मातोश्रीवर गेले. त्यानंतर साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये संजय राऊत राज ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती देतील. त्यानंतर उद्या युतीची घोषणा करण्यासाठी कशापद्धतीचे नियोजन असले पाहिले याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीश सरदेसाई हे देखील या बैठकीत उपस्थित आहेत. त्यामुळे ज्या काही चार ते पाच जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील काल सर्व आमदारांसोबत जागावाटपाबाबत चर्चा केली होती. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीची घोषणा करण्यापूर्वी संजय राऊत आणि राज ठाकरे यांची जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठीची ही शेवटची बैठक असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT