uddhav thackeray group saamana editorial Criticism pm narendra modi Government  Saam TV
मुंबई/पुणे

Saamana Editorial: 'द्वेष, सूड, बदला, फसवणूक, ही मोदी- शहांच्या भाजपची चतुःसूत्री...' सामनातून हल्लाबोल

Saamana Editorial Criticizes BJP: मोदी-शहांच्या भाजपचे राजकारण हे द्वेष, सूड, बदला, फसवणूक या चतुःसूत्रीवर आधारित आहे... अशा तिखट शब्दात सामनामधून हल्लाबोल करण्यात आला आहे....

Gangappa Pujari

Saamana Editorial News:

सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग आला आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे सामनामधून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका....

काँग्रेस पक्ष (Congress) हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता 'शहरी नक्षलवाद्यांकडे आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करीत आहेत.

मोदींचे (PM Narendra Modi) म्हणणे आहे की, “सर्वात आधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे." मोदी यांचे हे विधान राजकीय संस्कृती व सभ्यतेस धरून नाही.

हे द्वेष, सूड, बदला, फसवणूक ही भाजपची चतुःसूत्री...

मोदी यांना शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांना संपवायचे आहे, पण त्यांना लडाखमध्ये घुसलेल्या चीनला संपवायचे नाही. त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार संपवायचे नाहीत. त्यांना काँग्रेसला संपवायचे आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना काँग्रेस, शिवसेना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवता आले नाही.

ईडी, सीबीआय हाताशी नसेल तर या वेस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, असे देशाचे वातावरण आहे. 'इंडिया' आघाडीची निर्मिती होताच वेस्ट इंडिया कंपनीने घाईघाईने 'एनडीए'चा जीर्णोद्धार केला. त्या एनडीएतून आता तामिळनाडूतील प्रमुख पक्ष 'अण्णा द्रमुक' बाहेर पडला. 2024 पर्यंत मारून मुटकून बनवलेला 'एनडीए'चा तंबू पूर्णपणे रिकामा पडलेला दिसेल. कारण मोदी-शहांच्या भाजपचे राजकारण हे द्वेष, सूड, बदला, फसवणूक या चतुःसूत्रीवर आधारित आहे. व सनातन धर्मात या चारही गोष्टींना स्थान नाही.

कॉंग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप (BJP) हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. काँग्रेसने कर्नाटक जिंकले. काँग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगणा जिंकत आहे. काँग्रेस राजस्थानात जिंकण्याच्या रेषेवर आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे.

महाराष्ट्रासारख्या (Maharashtra Politics) राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT