Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Symbol: अखेर ठाकरे गटाचं ठरलं! निवडणूक आयोगाला दिले 'या' तीन चिन्हांचे पर्याय

आपल्या गटासाठी उद्धव ठाकरेंनी संभावित नावं आणि चिन्ह ठरवंलं असून त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगासमोर पर्याय ठेवले आहेत.

Jagdish Patil

शिवाजी काळे -

मुंबई: आपल्या गटासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संभावित नावं आणि चिन्ह ठरवंलं असून त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगासमोर पर्याय ठेवले आहेत. पहिला त्रिशुल, दुसरा उगवता सुर्य आणि तिसरं मशाल या चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाकडे देण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे ही तीनही चिन्ह हिंदू धर्माशी निगडीत आहेत.

राज्याच्या आणि शिवसेनेच्या (Shivsena) राजकारणाला धक्का बसेल असा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आयोगाच्या निर्णयानुसार (Election Commission) आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावं शिंदे आणि ठाकरे गट पोटनिवडणुकीत वापरु शकणार नाहीत. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत कोणत्या नावावर दोन्ही गट निवडणूक लढवणार आणि त्यासाठी त्यांची चिन्हं काय असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अशातच आता उद्धव ठाकरेंनी आपल्या गटासाठी संभावित तीन चिन्हांचे आणि नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर दिले असून त्यामध्ये त्रिशुल, उगवता सुर्य आणि मशाल यातील एक चिन्ह आपणाला मिळावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

शिवाय आपल्या गटाचं नावं हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळावं अशी मागणी आयोगाकडे ठाकरे गटाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT