Uddhav Thackeray Speech In Shivdi Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : शिवडीत शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन; उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणाने शिवसैनिक चार्ज

Shivsena Latest News : यावेळी उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलले की, आता पुन्हा एकदा समान्यातून असामान्य घडवायचं आहे. कोणत्या शक्तीशी पंगा घेतलाय त्यांना ठाऊक नाही.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवडीतील शिवसेना (Shivsena) शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांची तूफान गर्दी पाहायला मिळाली. शिवडीतील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत करत शक्तीप्रदर्शन केलं. शिवडीतील शिवसेनेच्या अभ्युदयनगर इथल्या २०५ क्रमांकाच्या शाखेचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. (Uddhav Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधीत करत बंडखोरांवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले की, हल्ली आमदार खासदारांचं ऐकावं लागतं. अरविंद (खासदार अरविंद सावंत) अजय सोबत आहेत, मला विश्वास आहे, पाला पाचोळा उडून जाईल पण मुळं घट्ट आहेत. जे गेले त्यांचं वर्णन काय करायचं? त्यांनी विनंती केली की, कृपा करून आम्हाला गद्दार म्हणू नका. पण, तुम्ही स्वतःहून कपाळावर लिहून गद्दार घेतलंय असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. माझ्या आजूबाजूला खासदार आमदार आहेत, पंजे गेलेत ते निवडणून येऊ शकतात का? बंडखोरांना आता सुरक्षा दल, राखीव दल, केंद्राची सुरक्षा लागते, कोणासाठी कशासाठी? २०१९ साली भाजपसोबत करार ठरला होते, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. भाजप बहुमतात आलं, नकोय ते मंत्री पद केंद्रात दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपला आणि बंडखोरांना टोला लगावला. ते म्हणाले, आज मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलं, हे अडीच वर्षांपुर्वी केलं असतं तर भाजपच्या दगडाला शेंदूर लागला असता.

यावेळी उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलले की, आता पुन्हा एकदा समान्यातून असामान्य घडवायचं आहे. कोणत्या शक्तीशी पंगा घेतलाय त्यांना ठाऊक नाही. शिवसेनेने या दगडाला शेंदूर फासला होता, ते गिळायला बसलेत, त्यांच्या मागे महाशक्ती आहे. महाशक्ती कळसूत्री आहे, त्यांना शिवसेना संपवायची आहे असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. पुढे ते म्हणाले, ज्यावेळी संकटं आली, त्याला गाडून सेना जोमाने उभी राहिलीय. आधी शिवसेना फोडून आता शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही, काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिलीय. मी पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र फिरणार आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे, ठाकरे-सेना नातं तोडायचं आहे, पण ठाकरे आणि सेना नातं घट्ट राहणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच तुमच्यात मर्दपणा असेल तर माझ्या वडीलांचा फोटो लावू नका, हिम्मत असेल तर स्वतःच्या नावावर निवडून येऊ असं आव्हान त्यांनी यावेळी बंडखोरांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT