Gajanan Kirtikar Saam Tv
मुंबई/पुणे

Gajanan Kirtikar: मला मानसिक त्रास झाला, शिवसेनेतून हकालपट्टीच्या मागणीवर गजानन किर्तीकरांनी व्यक्त केल्या वेदना

Gajanan Kirtikar On Shishir Shinde: उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलेल्या गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

'माझी हकालपट्टी करण्याची भूमिका हा पक्षाचा भाग आहे. तो चव्हाट्यावर मांडायला नको होता. जर काही मुद्दा आहे तर मला एकनाथ शिंदे जे मुख्यनेता आहेत ते बोलावतील आणि बोलतील. पण मी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठिंबा देत आहे. त्यांना भक्कम साथ देणार आहे.' असे वक्तव्य मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलेल्या गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गजानन किर्तकर हे पक्षविरोधी वक्तव्य करत असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात गजानन किर्तीकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाल्याचे मत व्यक्त केले.

गजानन किर्तीकर यांनी सांगितले की, 'शिशिर शिंदे यांनी पत्र दिलं की माझी पक्षातून हकालपट्टी करा. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. जुना शिवसैनिक आहे. जो विचार करून मी आलो तसाच विचार करून ते आले. ते संवेदनशील आहे त्याने वेगळा अर्थ लावला. माझ्या आणि पत्नीच्या वक्तव्याचा विपर्यास झाला. या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला. पक्षासाठी मी आमच्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम केले.'

'माझी हकालपट्टी करण्याची भूमिका हा पक्षाचा भाग आहे. तो चव्हाट्यावर मांडायला नको होता. जर काही मुद्दा आहे तर मला एकनाथ शिंदे जे मुख्यनेता आहेत ते बोलावतील आणि बोलतील. पण मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. त्यांना भक्कम साथ देणार आहे. कनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली. त्यात मी ठराविक उद्दिष्ठ घेऊन आलो. शिवसेना बळकट करण्यासाठी आलो.', असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

त्यासोबतच, 'उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या ताकदीबाबत निवडणुकीनंतर कळेल. पहिल्यांदा असे लोकसभा निवडणुकीत होत आहे की दोन पक्ष गट झाले आहेत. जनता कोणाच्या बाजूंनी आहे हे निवडणुकीनंतर कळेल. मी ५७ वर्षे राजकारणात आहे. मी आणि माझे काम अनेकांनी पाहिले आहे. मी ज्या पक्षाशी होतो त्याला सोडू नये यासाठी माझ्या कुटुंबाने त्यांना काय वाटतं हे भाभडेपणाने सांगितलं आहे.', असे देखील ते म्हणाले.

पत्नीच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे म्हणत गजानन किर्तीकर यांनी सांगितले की, 'माझी पत्नी जिचा राजकारणाशी संबंध नाही तिच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. असा प्रसंग राजकरणात कोणावर येऊ नये. माझा मुलगा निवडणुकीत आहे जो विरोधी पक्षात आहे. मी गेलो पक्ष सोडून त्याची करणे मी अनेकदा सांगितली. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला. शिवसेना विचार हिंदुत्व, आक्रमकता, राष्ट्रीयत्व हे मला पटणारे मुद्दे आहेत. कारण शिवसेना भरकटत चालत होती. त्यासाठी उठाव झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT