Devendra Fadnavis Vs Sanjay Raut,  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : चोराच्या मनात चांदणे! फडणवीसांना अटकेची भीती का? 'सामना'तून तिखट सवाल

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

Satish Daud

Maharashtra Political News : मला अटक करण्यासाठी डाव रचण्यात आला होता. माझ्या अटकेची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती, असा सणसणाटी आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वारंवार सांगत असतात की, महाविकास आघाडी सरकार त्यांना अटक करणार होते व मुख्यमंत्री ठाकरे यांची त्या कारवाईस मूक संमती होती. मंगळवारीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तीच रेकॉर्ड पुन्हा वाजवली. फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ संस्कारांस शोभणारे नाही, अशी टीका सामनातून करण्यात आली. (Latest Marathi News)

फडणवीस हे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, माजी मुख्यमंत्री होते. 105 आमदारांचे नेतृत्व ते करीत होते. अशा नेत्याच्या मनात ‘‘मला अटक केली जाईल’’ अशी भीती का असावी? ‘खाई त्याला खवखवे’ किंवा ‘चोराच्या मनात चांदणे’ या दोन म्हणी मराठीत अशा प्रसंगाला साजेशा आहेत, असे चिमटे देखील सामनातून फडणवीसांना काढण्यात आले.

त्याचबरोबर कोणत्या प्रकरणात फडणवीस यांना अटक केली जाणार होती व त्या प्रकरणाचे पुढे काय झाले, त्या प्रकरणाशी फडणवीस यांचा काही संबंध होता काय, याचा खुलासा श्री. फडणवीस यांनी केला असता तर संभ्रमाची जळमटे दूर झाली असती, असा सवालही सामना अग्रलेखातून फडणवीसांना विचारण्यात आला आहे.

कशात काही नसताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख, पॅबिनेट मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांना तुमच्याच केंद्रीय तपास यंत्रणांनी अटका केल्याच ना? फोन टॅपिंगचे प्रकरण गंभीर वाटत नसेल तर मग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी फोन टॅपिंगच्याच प्रकरणात अटक का केली? याचे उत्तरही लोकांना मिळायला हवे, असंही सामना अग्रलेखातून विचारण्यात आलं आहे.

रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले व हे कृत्य बेकायदेशीर होते. ज्यांचे फोन ‘टॅपिंग’ केले ते नेते विरोधी पक्षांचे होते. या नेत्यांच्या फोन क्रमांकासमोर दहशतवादी, गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची नावे लिहून हे सर्व लोक देशविरोधी कारस्थान करीत आहेत म्हणून गृहखात्याकडे फोन टॅपिंगचा प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेतला. हा गुन्हा आहे की नाही, याचा खुलासा फडणवीस यांनीच करावा, 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT