Maharashtra Political crisis Shivsena News Update Uddhav Thackeray And Eknath Shinde SAAM TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार

शिवसेनेतील बंडाळी अजून संपुष्टात आलेली नाही. आमदारांपाठोपाठ खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. शिवसेनेतील ही बंडाळी थांबण्याची चिन्हे नाहीत. आमदारानंतर आता खासदारही शिंदे गटात जाणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. तत्पूर्वी, काही खासदारांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. (Shivsena Rebel after MLA Sena MP Will Join Eknath Shinde Faction)

शिवसेनेला (Shivsena) बंडाचं लागलेलं ग्रहण अद्याप संपुष्टात आलं नाही. शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेतील हे बंड आता संपुष्टात येईल असे वाटत असतानाच, बंडाची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे.

आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांनीही बंडाचं निशाण फडकावल्याचं सध्या तरी दिसतंय. शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या १२ खासदारांना खासदार विकास निधीतून प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.

या १२ खासदारांपैकी आठ खासदार हे उद्धव ठाकरे यांनी आज, मातोश्री या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी श्रीकांत शिंदे, भावना गवळी, कृपाल तुमाणे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेचे काही खासदार अमित शहांना भेटल्याची चर्चा

शिंदे गटात ४० आमदार सहभागी झाल्यानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट गुप्त होती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी सेनेच्या एका तरुण आणि उच्चशिक्षित खासदाराने व्यूहरचना केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT