Uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

'शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप...'; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते,तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

मुंबई : 'मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं आणि भाजपचं हिंदुत्व काय ? शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray News In Marathi)

शिवडीतील शिवसेनेच्या (Shivsena) अभ्युदयनगर येथील २०५ क्रमांकाच्या शाखेचं नूतनीकरण करण्यात आलं. या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या उदघाटनाप्रसंगी खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहित सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज ते म्हणतात आम्ही मुख्यमंत्री केलं, मग अडीच वर्षापूर्वी का नाही केलं. आज मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलं, हे अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर भाजपच्या दगडाला शेंदूर लागला असता. अडीच वर्षांचं ठरलं होतं. मग तेव्हा शक्य होत नव्हतं, मग आज कसं शक्य झालं ? आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवायचं आहे. त्यांनी कोणत्या शक्तीशी पंगा घेतला आहे, त्यांना ठाऊक नाही. शिवसेनेने ज्या दगडाला शेंदूर फासला होता, ते गिळायला बसले आहेत. त्यांच्या मागे महाशक्ती आहे, महाशक्ती कळसूत्री आहे, त्यांना शिवसेना संपवायची आहे'

ठाकरे पुढे म्हणाले,'त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आहे. मी पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र फिरणार आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. पण ठाकरे आणि सेना नातं घट्ट राहणार आहे. तुमच्यात मर्दपणा असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावावर निवडून येऊ द्या. त्यांनी स्वत: आई-वडिलांना घेऊन महाराष्ट्रात मतं मागा. पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता वडिलही घ्यायला चालले आहेत'.

'मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं आणि भाजपचं हिंदुत्व काय ? शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते. एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो, तेव्हा लोक हळहळतात. हे तुमच्यामुळे झालं. मी वर्षा निवासस्थान सोडलं. पण मातोश्रीत आल्यावर माझी मूळ शक्ती मला मिळाली', असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT