Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

कपिल सिब्बल यांच्या 'त्या' प्रश्नांवरून शिंदे गट बॅकफुटवर? कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा...

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटातील वकिलांनी आपल्या युक्तीवादाला सुरूवात केली आहे. शिंदे गटाकडून वकिल नीरज कौल तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena News : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत असून शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटातील वकिलांनी आपल्या युक्तीवादाला सुरूवात केली आहे. शिंदे गटाकडून वकिल नीरज कौल तर ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहे. दरम्यान, युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलंय. (shivsena news supreme court)

'मुळ प्रकरणाचा विचार व्हावा'

आयोगासोबत मुळ प्रकरणाचा विचार व्हावा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांच्याकडून बंडाचा घटनाक्रम कोर्टात सादर करण्यात आला आहे. २९ जूनला सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती. २९ जूनंतर नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथ झाला. शिंदे गट १९ जुलैला निवडणुक आयोगात गेला. त्यामुळे १९ जुलैच्या पुर्वीच्या घटनाही महत्त्वाच्या आहेत. असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

'घटनापीठासमोर प्रकरण आणण्याची स्थिती निर्माण केली गेली असं कपिल सिब्बल कोर्टासमोर सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी 20 जूनला सुरू झाल्या. 21 जूनला आमदारांची बैठक बोलावण्यात आली. ज्यात अनेक आमदार आले नाही, ते गुवाहाटीला गेले'. असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. (maharashtra politics news today)

'29 जून खूप महत्वाचा होता त्याच दिवशी आमदारांविरोधात विधानसभा उपाध्याक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली. आमदार पक्षांच्या बैठकीला न येता ते थेट भाजपाच्या बैठकीत गेले त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणे योग्य आहे'. असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

आमचीच शिवसेना खरी, असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला. यावर ठाकरे गटाचे वकिल कबिल सिब्बल यांनी 'मूळ शिवसेना तुमची मग व्हिपचं पालन का केलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. 10 व्या परिशिष्टानुसार फुटीला मान्यता नाही, शिंदे गटाने पक्ष सोडला नव्हता तर मग व्हिपचं पालन का केलं नाही',अशी विचारणाही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT