Maharashtra Political Crisis : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. खरी शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? यावरून सध्या न्यायालयात राजकीय लढाई सुरू आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. (Eknath Shinde News Today)
शिंदे गटाकडून यासंदर्भात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
येत्या कालावधीत राज्यात महापालिका निवडणूका आहेत. शिवाय अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. त्याअगोदरच शिवसेना चिन्ह आणि पक्षाचा निकाल लावाणे आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी. अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. (Shinde vs Thackeray Shivsena Political Crisis)
राज्यात शिंदे गट स्थापन झाल्यानं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या दरम्यान बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं आमदारांवर अपात्रता तसंच शिंदे सरकारला आव्हान देत सुप्रीम कोर्टात ४ याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
शिंदे गट दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत
शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असताना, दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. अशातच शिंदे गटानेही आपण दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नेमकं शिवाजी पार्क कुणाला मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर घेतला जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.